गडचिरोली : जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना धानाचे सवलतीच्या दराने बियाणे उपलब्ध
The गडविश्व
गडचिरोली, १६ मे : महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयी करीता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जा द्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासुन ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यत एकात्मिक प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्याच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असुन शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबीकरीता अर्ज करावयाचा आहे.
राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षका अंतर्गत “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थीनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील भात, तुर, इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहे. जिल्हयाकरीता प्रमाणित बियाणे वितरण १० वर्षा आतील धान (वाण) ६९० किंव्टल व १० वर्षावरील धान (वाण) ३४५ किंव्टल आणि १० वर्षा आतिल तूर (वाण) २१ क्वी. १० वर्षा वरील १७ क्वीचे भौतिक लंक्षाक असुन धान पिकाकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदानित बियाणेचा लाभ मिळणार आहे. तरी इच्छुक व पात्र शेतकर्यांनी MAHADBT पोर्टल वर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईट वर जाऊन अर्ज करावे. असे आवाहन बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.