देसाईगंज : शेतशिवारात वाघाचा हल्ला, गाय ठार

987

– पुन्हा वाघाची दहशत वाढली
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १८ मे : शेतशिवारात गाय चरत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने भर उन्हात गायीवर हल्ला करून ठार केल्याची घटना देसाईगंज (Desaiganj_ तालुक्यातील कोंढाळा (kondhala) शेतशिवारात मंगळवारी घडली. सदर घटनेने परिसरात पुन्हा वाघाची दहशत पसरली आहे.
देसाईगंत तालुक्यातील कोंढाळा, उसेगाव परिसरात वाघाचा वावर आहे. अशातच नेहमीप्रमाणे कोढाळा येथील गुराखी गाय चरायला नेत होता. दरम्यान मंगळवारी भर उन्हात वाघाने गायीवर हल्ला करून ठार केले. विठ्ठल सोमा पेटकुले यांची ती गाय होती. गुराख्याने घटनेची माहिती गावात दिली असता गावकऱ्यांनी गायीचा शोध घेतला असता पंचफुला ठवरे यांच्या शेतालगत गाय मृतावस्थेत आढळुन आली. वनविभागाला सदर माहिती दिली असता कर्मचारी घटनास्थळ गाठून पंचनाा केला. परिसरात वाघाची दहशत असल्याने गुराख्यांनी त्या भागात गुरे चराई करीता नेऊ नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

(the gdv, the gadvishva,muktipath serch gadchiroli, gadchiroli news updates, Leicester City vs Liverpool, Sameer Wankhede, Brock Lesnar, Motorola Edge 40, tiger attack )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here