-विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास पालक जबाबदार
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १९ मे : तालुक्यातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ पोटगांव द्वारा संचालित इम्पेरीयल इंग्लीश मिडीयम स्कूल ही शाळा देसाईगंज तालुक्यातील पोटगांव येथे सुरु आहे मात्र या शाळेस शासन मान्यता आजवर मिळाली नसल्याचे उघडकीस आले असून पालकांनी सावधान व्हावे तसेच या शाळेत आपल्या पाल्याना दाखल केल्यास होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस पालक जबाबदार राहील असे आवाहन देसाईगंज पं.स. चे गटशिक्षणाधिकारी पुरुषोत्तम चापले यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.
तालुक्यातील पोटगांव येथे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ पोटगांव द्वारा संचालित इम्पेरीयल इंग्लीश मिडीयम स्कूल सुरू आहे. मात्र या शाळेला मान्यता न मिळाल्याने संबंधीत शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तसेच असे असतांनाही सदर शाळेत बरेच विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे शिक्षण विभाग, पंचायत समिती देसाईगंज जिल्हा परिषद गडचिरोली या कार्यालयाने दिलेल्या भेटीत आढळून आले असून यानंतर जे पालक आपल्या पाल्यांना या शाळेत दाखल करतील ती जबाबदारी त्या-त्या पालकांची असेल व होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही याची परिसरातील व इतर पालकांनी नोंद घ्यावी असे शिक्षणाधिकारी पंचायत समिती देसाईगंज यांनी प्रशिधापत्रकातून केली आहे. ©©©
(the gdv, the gadvishva, desaiganj, imperial english school potgao desaiganj, gadchiroli)