मनोरंजनात्मक चित्रफितीतून पटवून दिले व्यसनाच्या दुष्परिणाम

171

– धानोरा तालुक्यात जनजागृती
The गडविश्व
गडचिरोली, २१ मे : शहरी तथा ग्रामीण भागातील नागरिक, युवक व विद्यार्थ्यांना दारू व तंबाखू सेवनाने होणारे नुकसान ज्ञात व्हावे, यासाठी धानोरा शहरासह विविध गावांमध्ये व्हिडीओ व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ अभियानातर्फे ‘शाब्बास रे गण्या’ व यमराजाचा फास हा लघु चित्रपट मुख्य चौकात, बाजारात व वर्दळीच्या ठिकाणी दाखवण्यात आला.
ग्रामीण भागातील लोकांसह शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे व्यसन जळले आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास हानिकारक असल्याने शासनाने तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. याबाबत गावखेड्यासह शाळांमध्ये संदेश देण्यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे व्हिडीओ व्हॅनचा उपक्रम सुरु आहे. आतापर्यंत सदर व्हॅन जिल्ह्यातील अतिदुर्गम, दुर्गम, ग्रामीण व शहरातही पोहचली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून ‘यमराजाचा फास’, ‘शाब्बास रे गण्या’ यासह विविध मनोरंजनात्मक लघु चित्रपट दाखवून दारू व तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे.
धानोरा शहरात, येरकड, रांगी, कारवाफा गावातील बाजारात, निमणवाडा, नवरगाव, मोहली, चिचोली, वाघभूमी, भुरानटोला, झरी, हेटी, खरकाडी यासह विविध गावांमध्ये व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून यमराजाराचा फास, शाब्बास रे गण्या हा मनोरंजनात्मक लघुचित्रपट दाखवून ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यात आली. त्याअनुषंगाने चौकात गोळा झालेल्या लोकांना दारू व तंबाखूमुळे कोणते नुकसान होतात, शारीरिक बदल दिसून आल्यास मुक्तिपथ तालुका कार्यालयात सुरु असलेल्या क्लिनीकला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी मुक्तिपथ तालुका चमूने दारू, तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणामांची माहिती देत व्यसनापासून दूर राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
(the gdv, the gadvishva,muktipath serch gadchiroli, gadchiroli news updates) Leicester City vs Liverpool, Sameer Wankhede, Brock Lesnar, Motorola Edge 40)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here