The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ मे : तालुक्यातील मुरूमगाव येथील पराऊराम सदाराम हलामी (५१) यांनी पंतप्रधान जीवन ज्योती सुरक्षा विमा ३३० रुपयांचा काढला होता. त्यांच्या मृत्यूनंतर नुकताच पंतप्रधान जीवनज्योती सुरक्षा विमा योजनेचा मृतकाच्या कुटुंबांना लाभ मिळाला आहे.
पराऊराम सदाराम हलामी यांचा ०१ जून २०२२ रोजी मृत्यू झाला.
विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा मुरूमगाव येथील शाखा व्यवस्थापक एम सी डेहनकर, सिंगाडे, निखिल मेश्राम तसेच ओसवाल कॉम्पुटर चे बँक मित्र लच्छुराम बोगा यांच्या सहकार्याने मृतक पराऊराम सदाराम हलामी यांच्या वारसान (मुलगा) सुरेंद्र पराऊराम हलामी, व त्यांच्या पत्नी या दोघांना २ लाख रुपयांचा निधी देण्यात आले. यामुळे कुटूंबाला आर्थिक मदत होनार आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news)