कुरखेडा : ग्रामपंचायतीने कमवून ठेवलेल्या मालमत्ता नगरपंचायत गमावणार का ?

200

– कोट्यावधी किमती असलेल्या स्थावर मालमत्ता बेवारस
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, २८ मे : गडचिरोली जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत म्हणून झाले. तर ग्रामपंचायत काळात निर्माण झालेले मालमत्ता नगरपंचायतकडे वर्ग झाल्या. मात्र वर्ग झालेल्या या स्थावर मालमत्ता सांभाळ करण्याकडे नप प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कित्येक मालमत्ता भाडेकरू असलेल्या लोकांनी परस्पर विक्री करून मनमर्जीने बांधकाम करून कब्जा केल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात असल्याचे दिसते.
नगर पंचायत होताच स्थानिक लोकांची मालकी असलेल्या निवासी मालमत्ते वर अवाढव्य कर लादनाऱ्या नगर पंचायत ला स्वतःच्या मालमत्तेचा विसर पडावा ही आश्चर्य करणारी बाब असून नवीन गाड्यांचा लिलाव करतांना रेडी रेकनर नुसार भाडे निश्चित करून रजिस्ट्रार कडून रजिस्ट्री करणारी नगर पंचायत मात्र जुन्या भाडेकरू कडून ग्रामपंचायत कालीन भाडेच घेणार का ? असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. कुरखेडा नगरपंचायत स्थापन झाली तेव्हा पासून या स्थावर मालमत्ता असलेल्या दुकान दुकान गाड्यांचा भाडे करारनामे सुद्धा केले गेलेले नसल्याचे कळते तर नगर पंचायत कडे या मालमत्तेची मालकी दावा सिद्ध करणारी कसलीच लेखा नसल्याचेही बोलले जात आहे. नगर पंचायत समोर मुख्य मार्गावर होत असलेल्या या गैर प्रकारावर प्रशासनाची मुक संमती तर नाही ना ? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगरपंचायत प्रशासन सुरुवाती पासूनच भगवान भरोसे असल्याचे चित्र असून जिल्ह्यातील नगरपंचायती मध्ये पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसणे ही या सर्व अव्यवस्थेची मुख्य कारण आहेत. सध्या महसूल अधिकारी नगरपंचायत चे प्रभारी म्हणून तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे प्रभार असेल तरी प्रशासन प्रशस्त व्हावे या करिता यांचे कडून कुठलीही पुढाकार घेतले जात नाहीत. फक्त आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे या एकाच हेतू करिता त्यांना प्रभार दिला असल्याचे एकंदरीत व्यवहारातून स्पष्ट होते. वेळीच या गंभीर विषयात लक्ष देवून मालमत्ता पत्रक नियमित करून भाडे करार केले नाही तर ग्रामपंचायत काळात कमावलेल्या मालमत्ता गमावून बसण्याची वेळ नगर पंचायतींना येणार आहे. (the gdv, the gadvishva, gadchiroli kurkheda nagar panchayat, gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here