२७ महिन्यांपासून वेतन नाही… आणि त्याने उचलले टोकाचे पाऊल

697

– दोषींवर कारवाई करण्याची होत आहे मागणी
The गडविश्व
गोंदिया, १ जून : ग्राम पंचायत मध्ये परिचर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मागील २७ महिण्यांपासून वेतन न दिल्यामुळे त्याच्यावर उपासमारिची वेळ आली होती. उपासमारीने मरण्यापेक्षा विषप्राशन करून आत्हत्या करावी यासाठी परिचराने चक्क ग्राम पंचायतीच्या आवारात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी गोंदिया तालुक्यातील इर्री येथे घडलीए. रमेश नान्हु ठकरेले (४८) रा. इर्री असे त्या परिचराचे नाव असून त्याच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल केल्याचे कळते.
तालुक्यातील बहुचर्चीत असलेल्या इर्री ग्रामपंचायत येथील परिचराला मागील २७ महिण्यांपासून वेतन देण्यात आले नाही. ग्रामसेवकाच्या उदादिनी धोरणामुळे इर्री ग्राम पंचायत डबखाईस गेली आहे. ग्रामसेवकाने मागील २७ महिन्यांपासून परिचाराला वेतन दिले नाही. वेतनासंदर्भात परिचर हे ग्रामसेवकाला बोलत होते मात्र ग्रामसेकांनी कोणतेही न ऐंकता कामावरून बंद करू अशी धमकी देत असल्याचे कळते. वेतनच न मिळत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे तणावात रमेश याने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचाराकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असुन प्रकृती नाजूक असल्याचे कळते. तर या प्रकरणाच सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

(the gdv, the gadvishva, gondiya, irri, No salary for 27 months… and he took the extreme step)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here