आठवडाभरात ४४ रुग्णांनी घेतला व्यसन उपचार

142

-विविध ठिकाणी तालुका क्लिनिक
The गडविश्व
गडचिरोली, १ जून : दारूच्या व्यसनापासून त्रस्त झालेल्या रुग्णांना तालुकास्थळी उपचार मिळावे, यासाठी मुक्तीपथ तर्फे तालुका क्लिनिक सुरू आहेत. विविध तालुक्यातील ४४ रुग्णांनी आठवडाभरातून व्यसन उपचार घेतला आहे.
दारूच्या व्यसनी रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी जिल्हाभरातील बाराही तालुक्यातील मुक्तीपथच्या तालुका कार्यालयात व्यसन उपचार क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. नियोजित दिवशी आयोजित क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञांकडून समुपदेशन व उपचार केले जाते. या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून मुक्त झाले आहेत. या आठवड्यात अहेरी ४, कुरखेडा ५, चामोर्शी ३, गडचिरोली १०, एटापल्ली १२, आरमोरी १० अशा एकूण ४४ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
(the gdv, the gadvishva, gondiya, muktipath, irri, No salary for 27 months… and he took the extreme step)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here