The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १ जून : राष्ट्रीय मानव अधिकार संघटना नवी दिल्ली चे राष्ट्रीय संचालक अध्यक्ष गणेश डवरी यांनी गडचिरोली जिल्हा शाखेवर विनोद जक्कनवार यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. सदर नियुक्तीबद्दल अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी संचालित श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी चे अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार संघटना चंद्रपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोरेश्वर उईके, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सारंग दाभेकर, संघटन मंत्री तथा बजरंग दल व विश्व हिंदू परिषद ब्रम्हपुरी चे संतोष भांडारकर, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष आशिस सिंग राजपूत व भारतीय क्रांतिकारी संघटने चे संस्थापक अध्यक्ष डार्वीन कोब्रा यांनी विनोद जक्कनवार यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या.
मागील अनेक वर्षापासून विनोद जक्कनवार हे सामाजिक कार्यात कार्यरत असून गुरुदेव सेवामंडळात सक्रिय आहेत व गुरुदेव सेवामंडळाचे गडचिरोली जिल्हा प्रचारक आहेत. विनोद जक्कनवार यांच्या समाजिक कार्याची दखल घेऊन आशाताई पाटील राष्ट्रीय सचिव मानवाधिकार संघटना यांच्या शिफारशीने गणेश डवरी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी विनोद जक्कनवार यांची गडचिरोली जिल्हा प्रमुख म्हणून नुकताच नियुक्ती केल्यामुळे त्यांचे गुरुदेव सेवामंडळ गडचिरोली च्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुध्दा अभिनंदन केले.