कुरखेडा : अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक दुकान फोडले, लाखोंचा मुद्देमाल लंपास

436

– दुकानमालकाचे मोठया प्रमाणात नुकसान
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २ जून : शहरातील देसाईगंज मार्गावरील राऊत इलेक्ट्रॉनिक दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून ३ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा शहरातील इंडियन ऑईल पंपाच्या पुढे राऊत यांचे राऊत इलेक्ट्रॉनिक दुकान आहे. ३० मे च्या रात्रोला नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते गेले मात्र दुसऱ्या दिवशी ३१ मे ला सकाळच्या सुमारास दुकान उघडायला गेले असता दुकानाला लागलेले कुलूप दिसून आले नाही. दुकानात चोरी झाली असल्याची शंका आल्याक्षणी शटर उघडून बघितले असता दुकानातील ३५०० रुपये किंमतीचा कनेक्शन केबल १५ फूट, २५ हजार रुपये किंमतीचा कापर वायर ३०० किलो, ५० हजार रुपये किंमतीचा सबमर्शियल वायर ५० किलो, ३० हजार रुपये किंमतीचा बर्न कॉपर ५० किलो असा एकूण ३ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले. याबाबत कुरखेडा पोलीस ठाण्यात राऊत यांनी तक्रार दाखल करून अज्ञात चोरट्यांचा शोध लावून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे. शहरातील दुकानात झालेल्या चोरीने मात्र परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान कुरखेडा पोलिसांपुढे उभे आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli kurkheda, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here