The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २ जून : तालुक्यातील जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथील इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
नुकतास शुक्रवार २ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यात गडचिरोली जिल्ह्याचा नागपूर विभागातून तिसऱ्या क्रमांकावर निकाल लागला आहे. यात धानोरा तालुक्यातील जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा चा निकाल १०० टक्के लागला असून जागेश्वर चिन्नू मडावी ८२.४० टक्के गुण प्राप्त करत प्रथम, लोकेश देबिलाल औरसा ७९.६० टक्के व्दितीय, कु.संगिता अलसू नरोटे ७९.४० टक्के तृतीय क्रमांक पटकाविले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रा.एस.एम.पठाण, प्राचार्या. लिना हकीम, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेत्तर तसेच पालकवर्ग यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli dhanora, ssc result 2023)