– नागभीड-कांपा मार्गावर घडला अपघात
The गडविश्व
नागभीड, ४ जून : तालुक्यातील नागपूर मार्गावर एआरबी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर धकड होऊन झालेल्या अपघातात ४ जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार ४ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३३ टी २६७७ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागभीड मार्गे नागपूर जात होती दरम्यान नागपूर मार्गे येणारी एमएच ४९ बीआर २२४२ क्रमांकाच्या चारचाकी वाहन यांच्यात नागभीड-कांपा मार्गावर समोरासमोर धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की चारचाकी वाहनामधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर झाले. चारचाकी वाहनात एकूण सहा जण होते अशी माहिती असून मृतकामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. तर जखमीमध्ये एक मुलगी व महिलाचा समावेश असल्याचे कळते. अपघाताची माहिती होताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारचाकी वाहनातील मृतदेह व जखमींना काढले. जखमींना उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले असून अपघातातील जखमी व मृतकांचे नाव वृत्त लिहेस्तव कळू शकले नाही. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.
(the gdvz the gadvishva, nagbhid rood accident car and arb travals)