The गडविश्व
गडचिरोली, १० जून : देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव येथील विक्रेत्यांचा जवळपास ५ हजारांचा मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई तंमुस समिती, पोलिस पाटील व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
पिंपळगाव येथे तीन दारूविक्री करणारे आहेत. अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी संबंधीत विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तरीही सदर विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. दरम्यान, विक्रेत्यांनी हातभट्टी लावून दारू गाळण्यासाठी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे तंमुस अध्यक्ष धनिराम लेंढे, पोलिस पाटील माधुरी राऊत व मुक्तीपथ तालुका चमूने शोधमोहीम राबवली असता, जवळपास ५ हजार रूपये किमतीचा मोहफुलाचा सडवा व दारू गाळण्याचे साहित्य मिळून आले. संपूर्ण माल नष्ट करण्यात आला.