राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांना मिळणार १६ हजार रुपये मानधन

651

– मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
The गडविश्व
मुंबई, १३ जून : राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकाच्या मानधनात तब्बल १० हजारांची वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटीची मान्यता देण्यात आला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या सहा हजार रुपयांचा वेतन आहे ते आता १० वाढ होऊन थेट १६ हजार रुपये करण्यात आले आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशी अनेकदा मागणी झालेली होती. मात्र सरकारने थेट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ निर्णय

– सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता

– कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये

– अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.

– पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ

– लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार

– पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार

– अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ

– मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना

– स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ

– चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here