गडचिरोली : विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची कारागृहात रवानगी

192

The गडविश्व
गडचिरोली, १५ जून : जिल्ह्यातील आलापल्ली येथे विद्यार्थिनीवर अत्याचार केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना १४ जून रोजी गडचिरोली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना जामीन नामंजूर करीत त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.
जिल्ह्यातील आलापल्ली येथे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनींवर रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे या दोन युवकांनी अत्याचार केला. याप्रकरणी पिडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता अहेरी पोलीसांनी आरोपींना बेडया ठोकल्या. सदर घटनेने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली, विविध स्तरातून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. काल १४ जून रोजी आरोपींना गडचिरोली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन नामंजूर करत त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, crime news, aheri)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here