The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आज प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य असल्याने संपूर्ण ठिकाणी आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आहे, त्यानुसार आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद मध्ये ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कृषि सभापती रमेश बारसागडे, समाजकल्याण सभापती सौ.पारधी, महिला बाल कल्याण सभापती सौ.कोडापे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुत्तीरकर व सर्व विभागातील विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.