ढाणकी तलाठी कार्यालयात शुकशुकाट : महसूल मंडळातील कर्मचाऱ्यांना नियमांचा विसर

251

– हप्त्यातून काही दिवससच राहतात हजर
The गडविश्व
ढाणकी / प्रवीण जोशी, १७ जून : सध्या काही दिवसांनी शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी गाव पातळीवर महत्त्वाचा दुवा ठरतो तो तलाठी. प्रथम याच ठिकाणावरून कागदपत्राची पूर्तता होऊन नंतर पुढील कागदपत्राची जुळवा जुळवा होते. तसेच अनेक शासकीय विविध योजनांच्या लाभासाठी तलाठी यांना गाठल्या शिवाय पर्याय नसतो पण महसूल मंडळ ढाणकी येथील तलाठी कार्यालयात अधिकारी नियमित हजर असतात कुठे ?ढाणकी तलाठी कार्यालयात शुकशुकाट पहावयास मिळत आहे. काही महत्त्वाचे काम असल्यास तालुक्याला बोलावतात किंवा त्यांच्या सोयीनुसार वेळेनुसार सर्वसामान्यांना कामासाठी जावे लागते त्यामुळे इतरांच्या कामाला व वेळेला तलाठीच्या नजरेत शून्य किंमत आहे का हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडतो आहे.
तसेच तलाठीच्या एवढा अन्याय व अत्याचार सहन केल्यानंतर शासकीय कर्मचारी आहोत त्यामुळे आम्ही म्हणल तसेच प्रशासन वागेल हा तोरा तर त्यांच्या अंगवळनी पडलेला असतो. आम्ही म्हणल तेच होणार अशी वृत्ती दिसते त्यामुळे आपले काम पडल्यानंतर तलाठी आपल्या कामात अडचणी निर्माण करतील या हिशोबाने सर्वसामान्य शेतकरी व जनता बोलण्यास धजावत नसल्यामुळे शासकीय कर्मचारी निर्ढावलेले दिसतात तसेच ढाणकी शहर हे इतर गाव खेड्यासाठी मोठी व्यापार पेठ असल्यामुळे व येथे शेतकऱ्यांच्या व्यवहाराच्या दृष्टीने बँकेचे जाळे असल्यामुळे अनेक तलाठी केवळ सोमवारीच सर्वसामान्यांना यायला सांगतात. बाकीच्या दिवसाला त्यांच्या रोजनिशित मुळीच किंमत दिसत नाही. सोमवारीच फक्त तलाठी कार्यालयात हजर राहून “मु” दिखाई रस्म पूर्ण केल्या जाते यावरून शासकीय कामाची नियमावली केवळ सर्व सामान्यांनाच का जिथून नियमावलीची सुरुवात होते त्यांना असा उठोळपणा पणा चालतेच कसा हा मोठा प्रश्नच आहे. शासकीय कामे जलद गतीने व्हावी यासाठी गावोगावी प्रशासनाने कार्यालयाची निर्मिती केली तसेच कार्यालय ढाणकी शहरांमध्ये सुद्धा आहे पण येथे बाभळीची झाडे आणि अस्वच्छता हे तर सूत्रच बनले आहे आणि हे ठिकाण दारू पिणाऱ्यासाठी व इतर नको ते कामे करण्यासाठी नंदनवन बनले आहे त्यामुळे वरिष्ठ या बाबीकडे लक्ष देतील का हे गुढ रहस्य बनले.
शासकीय महसूल अधिनियमानुसार तलाठ्याचे कर्तव्य सूची क्रमांक ५७ प्रमाणे तलाठ्यांनी साजाच्या मुख्यालयी वास्तव्यास राहावे असे स्पष्ट निर्देश असले तरी जवळपास महसूल मंडळातील अनेक तलाठी या नियमाला “खो” देत असून सर्व नियम धाब्यावर बसून मनमानी पद्धती नुसार इतरत्र तालुक्याचे ठिकाणी बसून कामे करतात याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे तसेच लोकसेवा हमी कायदा २०१५ कलम ३ नुसार तलाठी कार्यालय मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा संबंधीची माहिती दर्शनीय भागावर लावणे सुद्धा बंधनकारक असते पण महसूल मंडळातील या नियमाला सुद्धा बगल दिल्या जात आहे. ढाणकी महसूल मंडळातील एका खंडाचा डोंगर इतर कर्मचाऱ्याला उचलत नाही का, एक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून एका साज्याला पक्का टिळा लावून बसला त्यामुळे त्यांची चांगलीच क्रेझ वाढली असून त्या ठिकाणचा मदतनीस नायक तर शेतकरी विलन ठरत असून एखाद्या वेळेस तलाठी नाही आले तर कार्यालयातील टेबलवर पाय ठेवून शेतकऱ्याला पेन फिरवत एक मदतनीस गोष्टी करत असल्याची चर्चा शेतकरी वर्गात असून महसूल मंडळ ढाणकी येथे यांचा होत असलेल्या “उभाधूल्ला धिंगाण्याची” चांगलीच खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here