संस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

230

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १७ जून : संस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटी मर्या गडचिरोली मुख्य कार्यालय – संस्कार भवन गांधी चौक कुरखेडा या संस्थेला पाच वर्षे पूर्ण झाल्याने ग्रामपंचायत सभागृह मालेवाडा येथे पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व सहकार रत्न पुरस्कार वितरण व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उदघाटन म्हणून लाभलेले मालेवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारतजी निकाळजे यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन करतांना ‘रोजगार करून बचत करावे व बचत च्या माध्यमातून गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन केले.
यावेळी सहकार तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विजयशहाजी सयाम सामाजिक कार्यकर्ते कसारी व तुळशिरामजी वाढई माजी व्यवस्थापक आ. वि. का. मालेवाडा यांचा संस्कार सोसायटी तर्फे सहकार रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना साडी व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनिषजी फाये, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष चांगदेवजी फाये संस्था उपाध्यक्ष तथा संचालक कृउबास आरमोरी, तसेच उद्घाटक म्हणून भारतजी निकाळजे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन मालेवाडा, तर विशेष अतिथी म्हणून यशवंतजी मेश्राम व्यवस्थापक आ. वि. का. मालेवाडा, जिवनजी बांगरे प्रतिष्ठित व्यापारी मालेवाडा, उल्हास भाऊ देशमुख, धीरज बांगरे मुख्य कार्यकारी अधिकारी, लोकेश हटवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन योगिता जांभूळे, प्रास्ताविक धीरज बांगरे तर पाहुण्यांचे आभार दिवाकर देवांगन यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रल्हाद लंजे,अक्षय काळबांधे, प्रशांत कवाडकर, विष्णू ठाकूर, राजू टेंभुर्णे, तिरुपती बोरकर, स्वप्निल खोब्रागडे, शिवसुंदर बन्सोड, इद्रिस पठाण, सुलक्षण नंदनवार, विलास लोखंडे, स्विटी खरवडे, मदन पचारे, राजकुमार गजप्पला, मोहित बन्सोड यांनी सहकार्य केले.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, kurkheda, malewada)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here