खळबळजनक : भाजप नेत्याची नक्षल्यांनी केली हत्या

3293
File Photo

– घराबाहेर निघताच वाटेतच अपहरण करून गळा चिरून केली हत्या
The गडविश्व
बीजापुर, २२ : नक्षल्यांनी भाजप नेत्यांची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना छत्तीसगडच्या बीजापुर जिल्ह्यातील इलमिडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
काका अर्जुन असे मृतकाचे नाव आहे. ते भाजप एसटी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते अशी माहिती आहे. बुधवारी काका अर्जुन हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता वाटेतच नक्षल्यांनी अपहरण करून जंगल परिसरात नेले व धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली व  मृतदेह गावाजवळ टाकून दिला. घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती असून या घटनेला बीजापुरचे एएसपी यांनी दुजोरा दिला आहे. नक्षल्यांच्या मुद्देड एरिया कमिटीने घटनेची जबाबदारी घेतली आहे. तर परिसरात पत्रके टाकून भाजपमध्ये काम न करण्याची धमकी देण्यात आल्याचे कळते. सदर घटनेनं मात्र परिसरात खळबळ उडाली असून दहशत पसरली आहे. यापूर्वी भाजप नेते नीलकंठ कक्केम यांची सुद्धा हत्या करण्यात आली आहे.©©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here