कोरची : लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक बेडगाव घाटावर पलटला

1427

– बेडगाव घाटात अपघातांची मालिका सुरूच
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा-कोरची, २६ जून : लोहखनिज वाहतूक करत असलेला ट्रक कुरखेडा-कोरची मार्गावरील बेडगाव घाटावरील रस्त्यावर पलटून अपघात झाल्याची घटना २६ जून रोजी उघडकीस आली आहे. या अपघाताने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथून दररोज लोहखनिज वाहतूक केल्या जाते. सुरजागड येथून गडचिरोली-कुरखेडा-कोरची मार्गे छत्तीसगड राज्यात लोहखनिज वाहतूक करणारा सीजी 07 सीएम 3832 क्रमांकाचा ट्रक बेडगाव घाट रस्त्यावर पलटला. ट्रक पलटल्याने संपूर्ण लोहखनिज रस्त्यावर अस्ताव्यस्त झाला असून काही काळ वाहतूक खोळंबलेली होती. दरम्यान या बेडगाव घाटावर अवजड वाहनांची रेलचेल असते कधी ब्रेक फेल झाल्याने तर कधी पलटल्याने अपघात झाले आहे. सदर अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते तर या मार्गावर अपघाताची मालिका सुरू असून हे घाट अपघात प्रवणस्थळ झाले असल्याने चालकांना अधिक सावधगिरी बाळगावी लागत आहे. वारंवार जडवाहनाने अपघात होत असल्याने या मार्गे जडवाहतुक बंद करण्यात यावी अशी सुद्धा मागणी जोर धरत असल्याचे कळते.

(the gdv, the gadvishva, gadchiroli, bedgao ghat, truck accident, Korchi: A truck carrying iron ore overturned in Bedgaon Ghat)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here