The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, २६ जून : ढाणकी शहरातील गुरुवर्य स्वामी बस्वलिंग महादेव मंदिरामध्ये वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी रविवार २५ जून रोजी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जून महिन्याचा शेवटचा आठवडा असला तरी पण आत्तापर्यंत अल्प प्रमाणात सुद्धा पर्जन्यवृष्टी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या पेरण्या थांबल्या तर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या जाणवत आहे तसेच माळपठारावरील जनावरांना जो चारा लागतो तो सुद्धा आत्तापर्यंत उगवला नाही त्यामुळे पाणी आणि चारा अशी दुहेरी समस्या सध्या शेतकऱ्यांसमोर तरी दिसत आहे आणि हे संकट निस्तरण्यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी व्यापारी यामुळे हैराण आहे. अशा परिस्थितीमध्ये वरून राजाने आपली कृपादृष्टी दाखवल्यास निसर्गनिर्मित पर्जन्यसृष्टीची समस्या निकाली निघेल व पृथ्वी पुन्हा सुजलाम सुफलाम होईल अशा सात्विक भावनेने ढाणकी शहरातील नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले राजमाता दुर्गोत्सव मंडळाने या महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी असंख्य शिवभक्त होते शिवाय महाकाल शिवशंकर शंभू महादेवाची पूजा करून नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी रविशंकर जमदडे, नागेश रातोळे, निरंजन नलगे, प्रसाद पाटील चंद्रे, वैभव रावते, बालाजी गंजेवाड, बालाजी रावते,नितीन मुक्कावार, संदीप सलगर, ऋषिकेश देशपांडे, शिवा पाटील झेंडे, पवन बोंपिलवार, साहील चंद्रे, गजानन आजेगावकर इत्यादी तरुणांची व समस्त शिवभक्तांची उपस्थिती होती.