बिटरगाव (बू ) पोलीस स्टेशन येथे प्रथमच महिला ठाणेदार सुजाता बनसोड स्वीकारणार प्रभार

256

– विद्यमान ठाणेदार प्रताप भोस यांची यवतमाळ नियंत्रण कक्षात नियुक्ती
The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, २७ जून : यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणून बिटरगाव(बू) पोलीस स्टेशनकडे बघितल्या जाते. तसेच मराठवाडा आणि विदर्भ यांचा मध्यबिंदू म्हणून हे पोलीस स्टेशन परिचित आहे तसे बघता बिटरगाव(बू) पोलीस स्टेशनची निर्मिती ही इंग्रज कालीन असून येथे अनेक मातब्बर व कर्तव्यदक्ष ठाणेदार यांनी आपले कार्य कर्तव्य बजाविले त्यातील एक कार्यतत्पर असलेले ठाणेदार प्रताप भोस यांनी आपला प्रशासकीय कालावधी पूर्ण केल्यामुळे त्यांची पोलीस नियत्रन कक्ष यवतमाळ येथे नियुक्ती झाली असून प्रथमच बिटरगाव(बू) पोलीस स्टेशन पदी महिला ठाणेदार सुजाता बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशनची निर्मिती झाल्यापासून प्रथमच महिला ठाणेदार हाती प्रभार घेणार आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले उत्कृष्ट कार्य पद्धतीने अनेक पदे भूषविली त्यात राष्ट्रपती पदापासून सर्वच ठिकाणी आपली कार्यकुशलता दाखवली आहे. त्यामुळे महिला ठाणेदाराचे कार्याविषयी परिसरात उत्सुकता लागली आहे. एकूण ३५ गाव खेड्याचा डोलारा बिटरगाव (बू) पोलीस स्टेशनला असून काही अतिसंवेदनशील गाव आहे तर कर्मचाऱ्यांची कमतरता सुद्धा या ठिकाणी जाणवते त्यामुळे अशा छोट्या-मोठ्या समस्या येथे दिसून येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here