आधी अपहरण, नंतर उपसरपंच आणि शिक्षकाची नक्षल्यांकडून हत्या

1919

– पोलीस खबऱ्या असल्याच्या आरोपातून हत्या केल्याचा संशय
The गडविश्व
सुकमा, ३० जून : छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांनी ताडमेटला गावचे उपसरपंच आणि शिक्षक दूताची लोक न्यायालय सुरू करून हत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेने खळबळ उडाली असून माडवी गंगा असे उपसरपंचाचे नाव आहे तर कावासी सुक्का असे शिक्षक दूताचे नाव आहे.
सदर हत्या पोलीस खबऱ्या असल्याच्या आरोपातून केल्याचे सांगण्यात येत आहे. तर यांच्यासह इतर १५ ग्रामस्थांचे सुद्धा अपहरण केल्याचे एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार कळते. यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरा उपसरपंच व शिक्षक दूत यांची लोकन्यायालय लावून फाशी लावून नक्षल्यांनी हत्या केली.
एका वृत्तसंस्थेनुसार १९ जून रोजी ताडमेटला परिसरातून नक्षल्यांनी १५ ग्रामस्थांचे अपहरण केले होते त्यानंतर त्यांची सुटका केली जाईल असे मानले जात होते मात्र बुधवारी सायंकाळी नक्षल्यांनी जंगलात लोक अदालत लावून उपसरपंच आणि शिक्षक दूताची हत्या केली. अन्य अपहरण झालेल्या ग्रामस्थांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तर दुसरीकडे बुधवारी दुपारीच सर्व आदिवासी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उपसरपंच आणि शिक्षण दूतासह सर्व गावकऱ्यांना सुखरूप सोडण्याचे आवाहन नक्षल्यांना केले होते असे कळते मात्र बुधवारी सायंकाळी उशिरा नक्षल्यांनी कावसी सुक्का आणि माडवी गंगा यांची हत्या केली. सदर घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here