आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश नायडू यांची गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्यपदी निवड

213

The गडविश्व
गडचिरोली, ३० जून : चंद्रपूरचे पहिले शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू राजेश नायडू यांची गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे २७ जून २०२३ रोजी क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे तसे एक पत्र काढण्यात आले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५७ (२) अंतर्गत गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून ही नियुक्ती करण्यात आली असून सर्वच स्तरातून राजेश नायडू यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान आपल्या नियुक्तीसाठी त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रभारी कुलगुरू, कुलसचिव, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि इतर हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहे.

– गोंडवाना विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत खेळाडूंच्या उत्तरोत्तर प्रगतिच्या दृष्टिने मला मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करता येईल याचा मला आनंद आहे, तसेच मी या संधीचा लाभ घेऊन विद्यापीठ व संपूर्ण क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंचा जास्तीत जास्त चांगल करण्याचा प्रयत्न करील.
– राजेश नायडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here