आरमोरी : नगर परिषद सभापतींच्या हस्ते नवागतांचे स्वागत

228

– न.प.आरमोरीचे आरोग्य व स्वच्छता सभापती भारत बावणथडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन भेट
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १ जुलै : जि. प. प्राथमिक शाळा काळागोटा (प्रभाग क्र.१) आरमोरी येथील सर्व विद्यार्थ्यांना आरमोरी नगरपरिषदेचे आरोग्य व स्वच्छता सभापती तथा भाजयुमो जि. महामंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थित विध्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वितरण करण्यात आले.
सोबतच पहिल्या वर्गात प्रवेश घेण्याच्या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व प्रभातफेरी काढण्यात आली.
त्यावेळी वॉर्डातील नागरिक, महिला व विनोद जवंजालकर, प्रमोद पेंदाम, प्रवीण भोयर, कालिदास लक्षणे, गोरक्षा कुरुंदकर, टिंकु बोडे, ठामेश्वर मैंद, गोलु वाघरे, भुपेश कुंभारे, शंकर धकाते व शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सभापती भारत बावनथदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here