– महाराष्ट्राच्या राजकारणात नेते सत्येमध्ये मस्त तर जनता मात्र दुष्काळामुळे त्रस्त
The गडविश्व
गडचिरोली, ४ जुलै : गडचिरोली जिल्हयामध्ये मागील एक महिण्यापासुन आवश्यक तेवढे पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे जुन महिण्यामध्ये पेरणी केली. परंतु पाऊस न आल्याने केलेली पेरणी वाया गेलेली आहे. तसेच बियाणे व खताचा सुध्दा फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी चिंतातुर असून याकडे कुढल्याही लोकप्रतिनिधीच लक्ष नाही. सध्या महाराष्ट्रात सिध्दांतहिन विचारहीन, स्वार्थी सत्तेसाठी हपापलेली राजकारणात नेते मंडळी मस्त आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता मात्र कोरडा दुष्काळाने त्रस्त आहे. या बाबींचा विचार करुन लवकरात लवकर शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये मदत करावी व तात्काळ बि-बियाणे, खते शेतकऱ्यांना मोफत पुरवण्यात यावी अन्यथा काॅग्रेस पक्षातर्फे आंदोलन करुन मंत्र्यांना घेराव करण्यात येईल. असा निर्वाणीचा इशारा माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेसचे अध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्रातील जुगाडू सरकारला दिलेला आहे.