गडचिरोली : उद्या पुन्हा ‘हे’ मार्ग राहणार सर्वसामान्यांच्या रहदारीस बंद

2239

– मुख्यमंत्री उद्या जिल्हा मुख्यालयी राहणार हजर
The गडविश्व
गडचिरोली, ७ जुलै : जिल्ह्यात ५ जुलै रोजी राष्ट्रपती दौऱ्या प्रसंगी गडचिरोली कॉम्प्लेक्स परिसरातील काही मार्ग सामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या ८ जुलै रोजी जिल्हा मुख्यालयी ” शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकरीता येत असल्याने उद्या सकाळी ०६.०० ते सायंकाळी ०६.०० वाजतापर्यंत काही मार्ग बंद राहणार आहेत तरी इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

‘हे’ मार्ग राहणार बंद

१) कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट
२) एम. आय. डी. सी. मार्ग
३) शासकीय विश्रामगृह मार्ग चंद्रपुर रोड
४) जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग आणि कॉम्प्लेक्स रोड हे मार्ग सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे.

मार्ग बंद असल्याने लाभार्थी कार्यक्रमात पोहचणार कसे ?

उद्या ८ जुलै रोजी गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ, दाखल्यांचे वितरण करणार आहेत. सदर कार्यक्रम मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार असल्याने वरील प्रमाणे मार्ग रहदारीकरीता बंद असणार आहेत. कार्यकामाकरीता पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. एकीकडे मार्ग बंद राहणार आहे आणि लाभार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी पोहचायचे कसे असा संभ्रम निर्माण झाला आहे.

● लाभार्थ्यांना तालुका प्रशासनाच्या वतीने कार्यक्रम स्थळी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
– सचिन अडसूळ
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली

(The gadvishva, the gdv, gadchiroli news, shsan aplya dari, CM Eknath Shinde, Dpt CM Devendr Fadnavis, Dpt CM Ajit Pawar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here