The गडविश्व
गडचिरोली, ९ जुलै : भाजप सरकार मतांचे दुर्वीकरण करण्यासाठी समान नागरी कायदा लागू करुन देशातील ओबीसी, दलित, आदिवासी, पारशी, मुस्लीम, सीख व इतर धर्मीयांचे घटनादत्त मुलभुत अधिकारांवर गदा आणण्याचे काम करीत आहेत. तसेच भाजपा हा पक्ष आर.एस.एस. च्या मनुविचारधारेवर चालणारा असल्याने भाजपा नेहमी आदिवासींचे घटनादत्त अधिकार हिस्कावण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यातुनच आदिवासींना अपमानित करण्याचे दृष्टिने वनवासी म्हणणे व देषातील सर्वोच्च पदावर कार्यरत असलेल्या आदिवासी महिला राष्ट्रपतींचा अपमान करणे, एवढेच नाहीतर मध्य प्रदेषातील भाजप कार्यकर्तेने एका गरीब आदिवासींच्या अंगावर लघुशंका करुन अमानविय जातीवादी भूमिका स्पष्ट केली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा भाजप व भाजप कार्यकर्तेच्या प्रदेष अध्यक्ष नानाभाउ पटोले व इतर लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेष आदिवासी काॅग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांनी भाजप कार्यकर्त्यांचा जाहिर निषेध केला व भाजप कार्यकर्त्यावर अट्रासिटी अक्ट नुसार गुन्हा नोंदविण्यात यावा व आदिवासी काॅग्रेसच्या वतीने, जिल्हाधिकारी, राष्ट्रपती अनुसुचित आयोगाकडे निवेदन पाठविण्याचे आवाहन ७ जुलै रोजी काशीनाथ घानेकर नाटय सभागृह ठाणे पश्चिम येथे आयोजीत कार्यशाळेमध्ये केले.
महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसने काॅग्रेस मधील एस.सी, एस.टी. ओबीसी, मायनारिटी, रोजगार स्वयरोजगार, सांस्कृतिक, पर्यावरण, उद्योग, माताळी कामगार, सामाजीक न्याय ग्राहक, स्वरक्षण पारधी सहकार परिवहन, विजेएनटी, डाॅक्टर, मत्सपालन, संजय गांधी, श्रावणबाळ इ. अशा एकुण काॅग्रेस पक्षाशी सलंग्नीत ३९ सेलची कार्यषाळा मा. प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ७ जुलै २०२३ ला डाॅ. काशीनाथ घानेकर नाटय सभागृह ठाणे पश्चिम येथे कार्यशाळा ठेवण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील प्रत्येक सेलचे जवळपास पंधराशे प्रमुख कार्यकारणी कार्यकत्यांची कार्यशाळा ठेवलेली होती. या कार्यशाळा मध्ये भाजपा सरकारच्या धोरणाविरोधात लढण्यासाठी समाजातील वेगवेगळया घटकांना एकत्रीत करुन काॅग्रेस पक्ष मजबुत करण्याचे आवाहन प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केले.
भाजपाने २०१३ च्या निवडणुकीत भ्रष्टाचार , महागाई, बेराजगारी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दिडपट करु अशा प्रकारे जनतेला प्रलोभन दाखविणारी आश्वासने दिली . पंरतु मागील ९ वर्षाच्या केंद्र व राज्यातील भाजप सरकारने महागाई रोखण्यात, युवकांना रोजगार देण्यात, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात तसेच भ्रष्टचारावर आळा घालण्यात अपयषी ठरलेले आहे. त्यातच काॅग्रेस भ्रष्टचार असल्याचा सर्वसामान्य लोकांमध्ये काॅग्रेस पक्षाला बदनाम केले. परंतु मागील ९ वर्षाच्या काळात एक ही नेत्याला भष्टाचारांच्या मुद्यावर जेलमध्ये टाकले नाही. याउलट भाजपाने या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्या नेत्यांना सत्तेमध्ये सहभागी करुन भाजपाने एन.सी.पी. नेत्यांवर पाघंरुन घातले, त्याप्रकारे स्टार्टअप, स्डॅन्डअप, मेक इन इंडिया, मुद्रालोन, अशा प्रकारचे सवंग प्रसिध्दी मिळविण्यासाठी लोकांना आश्वासन दिले. पंरतु या आश्वासनांवर देशात काम करण्यात भाजप अयशस्वी ठरलेली आहे. या सर्व बाबी जनतेने ओळखले असल्याने भाजप स्वबळावर देशात व राज्यात सत्तेत येवू शकत नाही. म्हणुन भ्रष्टचाराने बळबळलेल्या इतर पक्षाच्या नेत्यांवर ईडी, सि.बी.आय. चा वापर करुन भ्रष्ट नेत्यांना कार्यवाहीची भिती दाखवून आपल्या सत्तेत सहभागी करुन घेत आहे. या विरोधात काॅग्रेस पक्षातर्फे सर्वसाधारण लोकांमध्ये जागृती निर्माण करुन भाजप सारख्या खोटे बोलणाऱ्या जनतेचा विश्वासघात करणाऱ्या व देषातील अर्थव्यवस्था रसातळाला नेणाऱ्या भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी गाव तिथे काॅग्रेस अंतर्गत प्रत्येक गावात २५ लोकांची कमिटी करुन प्रत्येक बुथवर २५ कार्यकर्त्यांची नेमणूक करुन गल्ली ते दिल्ली पर्यंत काॅग्रेस पक्ष बळकट करुन या देशातील संविधान, लोकशाही व सर्वधर्माचा बचाव करण्यासाठी लढा उभारण्याचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाला संपूर्ण काॅग्रेस सेल चे प्रभारी, माजी मंत्री, डाॅ. सुनिल देशमुख, प्रज्ञा वाघमारे, सेल प्रमुख एम.पी.सी.सी व संपूर्ण सेलचे अध्यक्ष उपस्थित होते.