तलाठी भरती २०२३ : पेसा प्रमाणपत्रासाठी उमेदवारांची दमछाक, खिशाला अधिकची कात्री

1186

– प्रमाणपत्रासाठी गाठावे लागते जिल्हा मुख्यालय
The गडविश्व
गडचिरोली, १० जुलै : तलाठी पदभरती २०२३ ची जाहिरात मागिल महिण्यात प्रकाशित करण्यात आली. या भरतीतकरीता आवश्यक असलेल्या पेसा अंतर्गत प्रमाणपत्राकरिता उमेदवारांची चांगलीच दमछाक उडतांना दिसत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागाअंतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकुण ४६४४ पंदाच्या सरळसेवेकरिता २६ जून पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. सदर पदभरतीत गडचिरोली जिल्हयातील एकुण १५८ जागा भरण्यात येत असुन पेसा अंतर्गत १५१ जागा भरण्यात येत असल्याने सदर अर्जाकरिता एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने जारी केलेला पेसा प्रमाणपत्र आवश्यक आहे करिता उमेदवाराना जिल्हा मुख्यालय गाठून पेसा प्रमाणपत्राकरिता धावपळ करावी लागत आहे यामुळे त्यांची चांगलीच दमछाक उडतांना दिसत आहे.
गडचिरोली जिल्हयातील अधिकाअधिक भाग पेसा अंतर्गत येत असल्याने व सदर तलाठी भरतीकरीता पेसा अंतर्गत अधिक जागा असल्याने जिल्हयातील बेरोजगार युवकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र सदर अर्ज भरण्याकरिता कागदपत्रांची जमवाजमव करण्यारिता मात्र दमछाक उडत आहे. जिल्हा मुख्यालयातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय गाठून सदर प्रमाणपत्र प्राप्त करावे लागत असल्याने उमेदवारांना अधिकच भुर्दंडही बसत आहे. एकीकडे बेरोजगारीने शिखर गाठले असतांना आता पदभरतीने अशा पल्लवीत झाल्या मात्र अशाप्रकारे कागदपत्रांसाठी होत असलेल्या हेळसांडीमुळे मात्र बेरोजगाराच्या खिशाला अधिकची कात्री बसत आहे. आधिच अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्ग व पेसा क्षेत्राबाहेरील उमेदवाराकरीता १००० रूपये, मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्टया दुर्बल घटक व पेसा क्षेत्रातिल उमेदवांना ९०० रूपये परीक्षा शुल्क तसेच ऑनलाईन अर्ज करण्याकरीता २०० ते ३०० रूपये मोजावे लागत असतांना आता पेसा प्रमाणपत्राकरिता जिल्हा मुख्यालय गाठावे लागत असल्याने अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अर्ज केल्यानंतरही दोन ते तिन दिवसांनी प्रमाणपत्र मिळत असल्याने उमेदवारांना दोनदा चकरा माराव्या लागत आहे. पेसा प्रमाणपत्रकारिता दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने अर्ज करण्याची मुदत वाढविण्याची मागणीही होत आहे.

पेसा प्रमाणपत्राकरिता प्रक्रिया

1. सर्वप्रथम आपले गाव पेसा क्षेत्रामध्ये येत असल्याबाबतचे ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रमाणपत्र घ्यावे.

2.एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात पेसा अंतर्गत प्रमाणपत्राकरिता अर्ज करावे

3.स्वयंघोषणापत्र पासपोर्ट साईज पोटोसह

4. अर्जासह अधिवास प्रमाणपत्र, टि.सी, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, स्वयं घोषणापत्र, पेसा प्रमाणपत्र ग्रामपंचायत इत्यादी कागदपत्रे जोडून अर्जासद एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात दाखल करावे लागते. त्यानंतर दोन ते तिन दिवसात कागदपत्रांची छाननी करून पेसा प्रमाणपत्र प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे देण्यात येतो. ⒸⒸⒸ

(the gadvishva, the gdv, gadchiroli news, talathi recrutment 2023, pesa certificate)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here