The गडविश्व
गडचिरोली, १३ जुलै : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप २०२३ हंगामात राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १/- रुपया विमा हप्त्यात त्यांचा पीकाचा विमा उतरविण्याची योजना जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी राज्यात निवडलेल्या ९ विमा कंपन्यांच्या माध्यमातून केली जात आहे. पीक विमा योजनेत नोंदणी करताना सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालकांनी शेतकऱ्याकडून विमा हप्त्यापोटी १/- रुपया घेऊन त्यांच्याकडून इतर कोणतेही शुल्क न स्विकारता विमा योजनेत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र असे असताना राज्यात विविध ठिकाणावरून सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालक हे शेतकऱ्याकडून १/- रुपया विमा हप्ता व्यतिरिक्त जादा रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कृषी मंत्री यांनी कडक प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रधानमंत्री पिक विमा करिता सिएससी चालकांनी 1 रूपया व्यतिरिक्त जादा रक्कम घेतल्यास कारवाई होणार आहे.
खरीप २०२३ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम ३१ जुलै, २०२३ असा आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणावर सामूहिक सेवा केंद्राच्या (CSC) माध्यमातून होत असते. पीक विमा योजनेत सामूहिक सेवा केंद्राच्या (CSC) माध्यमातून झालेल्या नोंदणीसाठी शेतकऱ्यामागे प्रति अर्ज रुपये ४०/- प्रमाणे रक्कम विमा कंपन्यांकडून सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालकांना देण्यात येते.. मात्र असे असताना राज्यात विविध ठिकाणावरून सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालक हे शेतकऱ्याकडून १/- रुपया विमा हप्ता व्यतिरिक्त जादा रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. पीक विमा नोंदणीसाठी शेतकऱ्याकडून पीक विमा हप्ता पोटी जमा करावयाच्या १/- रुपया व्यतिरिक्त इतर रक्कम सामूहिक सेवा केंद्रामार्फत (CSC) घेतली जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून यासाठी प्रत्येक सामूहिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायत, बाजार समिती या ठिकाणी अशा प्रकारची माहिती प्रदर्शित करणार आहेत. जिल्ह्यात कोणी सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालक अशा प्रकारे गैरवर्तणूक करत असेल तर त्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी केली जाणार आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, Pm pik vima yojna 2023, csc, gadchiroli)