मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोलीतर्फे राष्ट्रीय युवा कौशल्य दिवस उत्साहात साजरा

167

– जि.प. उच्च प्राथमिक शाळा नगरी आणि शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पोर्लाचा उत्कृष्ठ सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, १५ जुलै : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली जिल्हात मागील तीन वर्षांपासून १२ ते १६ वयोगटातील मुलांसाठी “खेळाच्या माध्यमातून विकास व विषयात्मक शिक्षण” सत्राच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जीवन कौशल्य – संवाद कौशल्य, संघकार्य, समस्या सोडविणे, शिकण्यातून शिकणे, स्व – व्यवस्थापन व विषयात्मक शिक्षण – संख्या ज्ञान व भाषा ज्ञान आदी क्षेत्रावर काम करीत आहे.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नगरी अंतर्गत युवक कौशल्य दिवस युवकांचे कौशल्य या विषयावर चित्रकला स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये एकूण १७ मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.उच्च प्राथमिक शाळा नगरी चे मुख्याध्यापक राजेंद्र एन घुगरे, प्रमुख पाहुणे म्हणून विषय शिक्षिका सुषमा एम मडावी, सहायक शिक्षक विलास भोयर, सहायक शिक्षिका हर्षलता दत्तात्रय कुमरे यादी मान्यवर उपस्थित होते.
तर शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला शाळेतील या स्पर्धेमध्ये एकूण १६१ मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी हासस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला चे प्राचार्य डी.एम.दिवटे, प्रमुख पाहुणे म्हणून एस एल दोनाडकर , सौ. बी. बी. वासेकर, जी पी वणकर , एस एम पडवाल, डी. जी. सेडमाके, कु. आर.वि.राजनहिरे, कु. कुकुडकार यादी मान्यवर उपस्थित होते.
मुलांना त्यांच्यात असलेले कौशल्य माहिती व्हावेआणि त्यांनी त्या कौशल्याचा वापर करून आपला भविष्य घडवावा असे या कार्यक्रमाचे उद्देश होते.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व गडचिरोली तालुक्याचे समन्वयक देवेंद्र हिरापुरे यांच्या सहकार्याने व जीवन कौशल्य शिक्षक लेखाराम हुलके, विषय शिक्षक अनिल खोब्रागडे, जीवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here