रांगी येथील शेतकरी लाभार्थीच्या गुरांच्या गोठ्यांचे अंतिम बिल कधी ?

278

-लाभार्थी प्रतीक्षेत
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, १५ जुलै : पंचायत समिती धानोरा अंतर्गत रांगी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०१९-२०२० ते २०२०-२१ मध्ये गुरांच्या गोठ्यांचे बांधकाम पुर्ण केले. परंतु पुर्ण झालेल्या शेतकरी लाभार्थी अंतिम बिल‌ कधी असा प्रश्न विचारीत आहेत.
तिन-चार वर्षापासून बांधकाम पूर्ण होऊन बिल न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांवरती उपासमारीची पाळी असल्याने सदर रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी शेतकरी लाभार्थ्यांनी केली आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजगीचे माती, बोळीचे माती काम करण्यात येते. त्याचप्रमाणे रांगी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०१९-२०, २०२०-२१ गुरांच्या गोठ्याचे बांधकाम करण्यात आले. गुरांच्या गोठ्याचे अंदाजपत्रक एकाच गावातील लाभार्थी अंदाजपत्रक रक्कम वेगळी आहे. त्यात ९४४३१,१००७४५,९५१३४, १००६५३, ८८६४३ अशी रक्कम वेगळी त्यापैकी लाभार्थ्यांना ६७४४४, ७६४२७, ७६४२९, ६८२४२, ६६६१८ रक्कम प्राप्त झाली खरी पण उर्वरित रक्कम आजतागायत प्राप्त झालेली नाही. काही लाभार्थीचे अर्धकुशल कामाचे बिलच रोजगार सेवकांनी सादर केलेले नाही त्यामुळे पाणी कुठे मुरते हेच लाभार्थ्यांना कळलेले नाही.
ज्या शेतकऱ्यांचे जनावरे आहेत त्याच शेतकऱ्यांच्या जनावरांना राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी गुरांच्या गोट्यांचा लाभ घेतला. लाभ देत असताना प्रत्येक गोठ्यांचे इस्टिमेट वेगवेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आले आणि त्याची किंमतही वेगवेगळी तयार करण्यात आली त्यानंतर त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांचे काही बिल काढण्यात आले आणि शेवटचे अंतिम आजतागत लाभार्थ्यांना मिळाले नाही. यावर कोणीच बोलायला तयार नाहीत. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असून सदर रक्कम गेली कुठे असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
गुरांच्या गोठ्यांचे बांधकाम सारखे, त्याची लांबी रुंदी सगळे सारखेच, सामान, मिस्त्री सारखेच असताना एस्टिमेटचे रक्कम वेगळी कशी असा प्रश्न शेतकरी लाभार्थी विचारत आहेत. बांधकाम पुर्ण होवुन अजून पर्यंत पैसे मिळालेले नसल्याने शेतकरी आजही शासनाकडून आज नाही तर उद्याला तरी मिळेल या आशेवर आहेत.
सरकार पैसा उपलब्ध करून देणार की नाही याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी स्वता बांधकाम करताना रक्कम खर्च केली खरी पण आता मिळणार की नाही याच विवंचनेत आहेत. सदर गुरांच्या गोठ्याचे फलक शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून खर्च केले तरीही त्यांची रक्कम कपात करण्यात आली आहे. ज्या लोकांना जनावरे नाहीत अशा शेतकऱ्यांनी यांचा लाभ घेतला आहे. पशुवैदकिय डॉक्टराकडुन खोटे प्रमाणपत्र घेऊन शासनाच्या गुरांच्या गोठ्याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे खोटे प्रमाणपत्र जोडून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या गुरांच्या गोठ्यांच्या बांधकामाचे शिल्लक पैसे त्वरित देण्यात यावे अशी मागणी शेतकरी लाभार्थ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here