म.रा. कृषी विभाग लिपीक वर्गीय गडचिरोली जिल्हा संघटनेची नविन कार्यकारिणी गठीत

397

The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय येथे आज 27 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपीक संवर्ग संघटना, पुणे शाखा गडचिरोली संघटनेची सभा आयोजीत करण्यात आली होती. सदर सभेमध्ये लिपीक वर्गीय संघटनेची नविन कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
यावेळी लिपीक वर्गीय संघटनेच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी सतिश भैयालाल देशमुख, उपाध्यक्षपदी मोती बळीराम चौधरी, सचिवपदी प्रशांत नामदेवराव मते, कार्याध्यक्ष/प्रचार प्रसिध्दी प्रमुख पदी देवानंद रामदास कोटगले तर कोषाध्यक्षपदी हेमेंद्र यादव धकाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here