The गडविश्व
ता.प्र /धानोरा, १७ जुलै : तालुक्यातील रांगी परिसरातील शासकीय आश्रम शाळेच्या बाजुला मोठ्या तलावात सोमवार १७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास निलगाय मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे.
रांगी येथील मोठ्या तलावात सकाळी अंदाजे ९.०० वाजताच्या दरम्यान निलगाय मृतावस्थेत आढळल्याची माहिती गावकऱ्यांना कळताच सदर माहिती वनविभागाला देऊन वनमजुरांनी मृत निलगाय पाण्यातुन बाहेर काढली. निलगायीचा वन्य प्राणी किंवा इतरांनी पाठलाग केला असावा आणि त्यामुळे ते तलावात पडले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मृत निलगाय ७ ते ८ महिन्याचे अल्याचा अंदाज गावकरी व्यक्त करताना दिसतात.