The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १९ जुलै : तालुक्यातील कढोली नजीक असलेल्या वासी येथील एका महाविद्यालयीन तरूणीने गावातीलच घरा जवळ असलेल्या सार्वजनिक विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ जुलै रोजी उघडकीस आली. रूपाली गोपाल लटये (२०) असे मृतक विद्यार्थीनीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक विद्यार्थीनी ही १७ जुलै च्या रात्रो पासूनच घरून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी रात्रोच सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही. दरम्यान १८ जुलै ला सकाळच्या सुमारास गावातीलच सार्वजनिक विहिरीत तिचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. घटनेची माहिती तात्काळ कुरखेडा पोलिसांना देण्यात आली असता घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून काढून पंचनामा केला. मृतक विदार्थीनी कुरखेडा येथील महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती अशी माहिती असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळले नाही. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शितल माने करीत आहेत.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, kurkheda, kadholi)