अतिवृष्टीचा तलाठी भरतीवर परिणाम : अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ

781

– अनेकांनी केले अर्ज दाखल
The गडविश्व
गडचिरोली, २१ जुलै : महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी २६ जून पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. अर्ज करण्यात १८ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मात्र अतिवृष्टीने ऑनलाईन अर्ज करण्यास २५ जुलै २३. ५५ वाजतपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील तलाठी पदभरती करीता २६ जून पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली त्यास १७ जुलै पर्यंत २३. ५५ वाजता पर्यंत मुदत होती मात्र त्यात एका दिवसाची वाढ देऊन १८ जुलै च्या २३. ५५ वाजता पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान या काळात अनेकांनी अर्ज दाखल केले. मात्र आता राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील (PESA क्षेत्रातील) व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याबाबत निवेदन शासन स्तरावर प्राप्त झाल्याने तलाठी भरतीच्या सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन शुल्क जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन शुल्क हे २५ जुलै रात्रो २३. ५५ वाजेपर्यंत सादर करता येणार आहे . त्यामुळे उमेदवारास काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

भरती प्रक्रियेत वेळोवेळी नव्या पूर्ततेची भर

तलाठी भरती दरम्यान वेळोवेळी नवनवीन प्रसिद्ध पत्रक काढण्यात आले. पेसा प्रमाणपत्राऐवजी इतर कागदपत्र अपलोड बाबत, पेअनुसूचित (पेसा) क्षेत्रातील उमेदवारांचे निवडीबाबत, ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या मुदतवाढीबाबत, दिव्यांग आरक्षण बाबत शुध्दीपत्रक तसेच मुक्त विद्यापीठातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराबाबत व आता दोन दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर पुन्हा अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याने. सदर भरती प्रक्रियामध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचे उमेदवारांमध्ये चर्चा ऐकायला मिळाली.

(the gdv, the gadvishva, gadchiroli, talthi bharti 2023, Impact of heavy rains on Talathi recruitment: Application deadline extended again)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here