The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे),२२ जुलै : येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा झाडीपट्टी रंगभूमीचे नावलौकिक असलेले कलावंत गणपतराव वडपल्लीवार यांचे काल २१.०७.२०२३ ला साय.४.०० वाजता ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.
झाडीपट्टी रंगभूमीवरील त्यांची कारकीर्द अशाप्रकारे आहे की, ते झाडीपट्टला जिवंत ठेवत गाजलेले नामवंत कलाकार, आजपर्यंत त्यांनी झाडीपट्टीत ७००० पेक्षा अधिक नाटकात विविध प्रकारच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले. विशेष म्हणजे सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक, यासारख्या कोणत्याही प्रकारच्या नाटकात जी भूमिका मिळेल ती प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करत असत. ‘मरीमाईचा भुत्या’, ‘तंट्या भिल्ल’, ‘वीर उमाजी नाईक’, ‘डाकू संग्राम’, ‘लावणी भुलली अभंगाला’, ‘सिंहाचा छावा’, ‘धर्मा भास्कर’, सामाजिक ‘जवानीचा झटका’ या नाटकात ‘संप्या दलाल’ नावाची भूमिका त्यांनी अप्रतिम साकारली होती. मरीमाईचा भुत्या नाटकातील ‘मंगू माडिया’ झाडीपट्टीतल्या प्रत्येक कलाकारांना आवडेल असा मंगू माडिया प्रत्यक्ष स्टेजवर सादर करणारे झाडीपट्टीच्या रंगमंचावर त्यांनी केवळ भूमिकाच नाही तर झाडीपट्टीत साहित्यिकाची सुद्धा भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांनी झाडीपट्टीला साजेसे असे विविध नाटके सुद्धा स्वतःच्या लेखणीतून साकार केली. ‘झाडपी माणसं’, ‘पांढऱ्या दुधाची काळी कथा’, ‘माता मायेचा मुंजा’, इत्यादी नाटके त्यांची प्रकाशित सुद्धा झालेली आहे. झाडीपट्टीची अविरत सेवा करणारे वडपलीवार गुरुजी म्हणजे झाडीचे “नटराज” म्हणून ओळखले जायचे तसेच झाडीपट्टी रंगभूमीवर असताना शिक्षकी पेशा सुद्धा व्यवस्थीत पार पडला. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त करत महाराष्ट्र शासनाकडून विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहे व रंगभूमीच्या माध्यमातूनही विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहेत )असे एकमेव शिक्षक होते. कलावंत म्हणून काम करुन सुद्धा शिक्षकी पेशातुन अनेक विद्यार्थी सुद्धा त्यांनी घडवले, शिक्षकी पेशात त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून वीस ते पंचवीस पुरस्कार प्राप्त केलेले आहे असे गुरुजी आज काळाच्या पडद्याआड लोप पावलेले आहेत त्यांना The गडविश्व परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.