गडचिरोली : हे पथदिव्यांचे खांब ही झाले बॅनर बांधण्यापुरते , रात्री सर्वत्र पसरतो रस्त्यांवर काळोख

834

– पथदिव्याचा उजेड हरपला
The गडविश्व
गडचिरोली, २३ जुलै : शहरातील चारही मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकांवर नवीन पथदिवे लावण्यात आले. मात्र आता हे पथदिवे फक्त बॅनर बांधण्याच्या उपयोगात येत असून रात्रोच्या सुमारास रस्त्यांवर काळोख पसरलेला दिसून येते. याकडे मात्र नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते.
शहरातील चारही मार्गावर नव्याने पथदिवे लावण्यात आले. काही दिवस ही पथदिवे सुरू असल्याने शहरात चकाकी दिसून येत होती मात्र आता ती लाईट बंद असल्याने रस्त्यांवर काळोख पसरला दिसते. तर मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात मोठा हायमास्ट लाईट लावण्यात आला मात्र तो ही सध्या बंदच राहत असल्याने पादचारी नागरिकांना रात्रोच्या अंधारात वाहनाच्या लाईटचा आधार घेत किंवा टॉर्च चा उपयोग करून रस्ता पार करावा लागत आहे. रस्त्यावर काळोख पसरल्याने अपघातांची शक्यता आहे तसेच रस्त्यावर मोकाट जनावरे राहत असल्याने अंधारात त्यांचा सुद्धा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने चक्क काळोख पसरलेला दिसून येत आहे.नुकताच काही दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून इंदिरा गांधी चौकात नव्याने सौन्दर्यीकरण करण्यात आले. रंगीत लाईट त्या ठिकाणी लावण्यात आले मात्र ते सुद्धा सध्याच्या परिस्थितीत बंद दिसून येत असल्याने शहरातील मुख्य चौकात अंधार पसरलेला आहे. तर हे पथदिवे केवळ आणि केवळ बॅनर बांधण्याच्या कामाकरिता येत असल्याचे दिसून येत आहे. बॅनर लावण्याकरिता न.प. कडे विशेष कर भरावा लागतो त्यामुळे पथदिवे जरी बंद असले तरी मात्र पथदिव्याच्या खांबाला बांधलेल्या बॅनर्स चा कर मात्र न.प. ला मिळत आहे तर नागरिकांना काळोख अंधारात आपली वाट धरावी लागत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, gadchiroli nagar parishad)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here