आठरी नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम करा

185

– परिसरातील नागरिकांची मागणी
The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, २३ जुलै : ढाणकी शहराच्या बाजूने आठरी नाला वाहत जातो शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावरील नाले त्यावरील पूल खूप जुने आहेत पावसाच्या हलक्या सरी जरी आल्या तरी पण ढाणकी नगरीत येणारे सर्व रस्ते बंद होत असतात. त्यामुळे आठरी नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील वर्षी ढाणकी फुलसावनगी रोडवरील पुलावर पाणी आल्याने पुलावरील पाण्याचा अंदाज आला नसल्याने एक व्यक्ती पुरात पाण्याबरोबर वाहत गेला. ढाणकी नगरीला जोडणाऱ्या जंगल परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्या वरील आठरी नाल्याला थोड्या पावसाने सुद्धा पूर येत असतो त्यामुळे दळण वळण पूर्णतः ठप होत असते. पुलावरील पाणी वाढत असतांना जंगल परिसरातील नागरिकांना ढाणकी नगरीत मुक्काम करावा लागतो याचा अनुभव अनेक नागरिकाला आला त्यामुळे परिसरातील नागरिक पावसाच्या हलक्या सरी जरी आल्या तरी ढाणकी किंवा तालुका उमरखेडकडे जाणे टाळतात. आठरी नाल्यावर नवीन पूल करावा म्हणून ढाणकी व परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला मागणी केली. नागरिकांची वाढती मागणी पाहून आमदार नामदेवराव ससाणे यांनी नवीन पूल करीता निधी उपलब्ध झाला असून लवकरच पुलाचे काम होणार असे आश्वासन दिले होते मात्र याला एक वर्ष होत आले परंतु पुलाचे काम झाले नाही त्यामुळे मागील दोन दिवसापासून पावसाच्या पाण्याने ढाणकी व बिटरगाव किनवट रस्ता बंद होता. नागरिक पुलावरील पाणी उतरण्याची तासनतास वाट पाहत आहेत. मागील वर्षी जिल्हाधिकारी आमोल येडगे यांनी पुलाची पाहणी करून बांधकाम विभागाचे अभियंता यांना नवीन पूला करीता प्रस्ताव पाठवण्याचे सांगून उपस्थित नागरिकाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले मात्र जिल्हाधिकारी यांचे आश्वासन सुद्धा आश्वासनच राहिले असल्याचे परिसरातील नागरिक बोलत आहेत. पुल खूप जुना असल्याकारणाने पुला शेजारील दोन्ही काठावरील शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे लवकरात लवकर पुलाचे बांधकाम करावी जेणे करून त्या परिसरातील नागरिकांचे दळण वळण अडवणूक होणार नाही अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here