गडचिरोली शहरातील मा.मा.तलाव (गोकुळनगर) १०० टक्के भरला ; तलावालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

693

The गडविश्व
गडचिरोली, २३ जुलै : सध्या पावसाळा सुरु असल्याने सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे २० जुलै २०२३ रोजी गडचिरोली शहरालगत गोकुळनगर येथील जलसंपदा विभागांतर्गत असलेला मा.मा. तलाव १०० टक्के भरलेला असुन तलावाचे सांडव्यावरुन २.०० सेंटीमीटर विसर्ग सुरु आहे. पुढील काही दिवस हवामान खात्याने पावसाची शक्यता दर्शविल्याने सांडव्यावरुन विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरिकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here