गोंडवाना विद्यापीठाने उन्हाळी २०२३ च्या परीक्षेमधील उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनाबाबत घेतले महत्त्वाचे निर्णय

1193

– उत्तरपत्रिकांचे मुल्यांकनाबाबत विद्यार्थ्याच्या होत्या तक्रारी
The गडविश्व
गडचिरोली, २५ जुलै : परीक्षा व मूल्यमापन मंडळाची तातडीची सभा सोमवार २४ जुलै रोजी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .
या सभेला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. अनिल झेड चिताडे, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, डॉ. जी. एफ. सूर्या, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ,डॉ .एस.एम. साकुरे अधिष्ठाता ,आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा , डॉ. मधुकर नक्षिणे, प्राचार्य, चिंतामणी वाणिज्य महाविद्यालय, पोंभुर्णा, डॉ. राजीव वेगिनवार प्राचार्य, चिंतामणी विज्ञान महाविद्यालय, पोंभुर्णा,डॉ. सतिश कन्नाके, सहा. प्राध्यापक, सरदार पटेल महाविलय, चंद्रपूर, डॉ. नविन मुंगले, उपकुलसचिव रा. तु. म. नागपुर विद्यापीठ, नागपूर, संचालक (प्र.) परीक्षा व मूल्यमापन मंडळ देवेन्द्र झाडे आदी उपस्थित होते.
यात उन्हाळी २०२३ च्या परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे मुल्यांकनाबाबत विद्यार्थ्याच्या प्राप्त तक्रारी संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या सभेत उत्तरपत्रिकांच्या मुल्याकनाबाबतबाबत विद्यार्थ्यांच्या प्राप्त तक्रारी संदर्भात बाब होती.

सदर विषयाच्या अनुषंगाने उन्हाळी २०२३ च्या परीक्षेतील बहुतांश अभ्यासक्रमांचे निकाल घोषीत झालेले असून सदर निकाला उपरांत विद्यार्थ्यांना थेरी व प्रात्यक्षिक विषयांमध्ये गुण देताना शुन्य, एक, दोन व पाच असे गुण देण्यात आले असल्याच्या तक्रारी मानवाधिकार संरक्षण मंच, नागपूर, जनता महाविद्यालय, चंद्रपूर. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर व आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथील विद्यार्थी, अशा साधारणतः २२०० विद्यार्थ्याच्या तक्ररी विद्यापीठास प्राप्त झालेल्या असल्याची माहिती सभेला उपस्थित सदस्यांना देण्यात आली. सदर विषयाबाबत सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली व चर्चेअंती विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता या प्रमाणे निर्णय घेण्यात आले.

ठराव १-ज्या विद्यार्थ्यांनी गुणदानाबाबत तक्रारी केलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह बोलावून त्यांना त्यांच्या लिखित उत्तरपत्रिका पालकांसमक्ष गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, विद्यार्थी सुविधा केंद्र, चंद्रपूर तसेच ब्रम्हपुरी,वरोरा, आरमोरी, अहेरी, चिमुर येथील संलग्नित महाविद्यालयांमध्ये दाखविण्यात यावे.
२. विद्यार्थ्यांना दिलेल्या गुणदानामध्ये तफावत आढळुन आल्यास एकुण तक्रारकर्ते विद्यार्थी संख्येच्या १० टक्के विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करण्यात यावे त्यामध्ये चुकीचे गुणदान झाल्याचे निदर्शनास आल्यास संपूर्ण
तक्रारकर्ते विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकांचे पुनश्च मुल्यांकन करण्यात यावे.
३. पुनर्मुल्याकंनामध्ये एखाद्या विषयामध्ये १० टक्केच्या वर गुण वाढत असतील तर अशा विद्यार्थ्याचे पुनर्मुल्याकन भरलेले शुल्क परत करण्यात येतील, असे सर्वानुमते ठरविण्यात आले..

४. पुनर्मुल्यांकनासाठी प्रती विषय रु ५००/- प्रमाणे शुल्क विद्यापीठाद्वारे आकारले जाते. परंतु विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांची परीस्थिती लक्षात घेता पुनर्मुल्याकनासाठी प्रती विषय रु ३००/- प्रमाणे शुल्क आकारण्या बाबत सदर विषय अंतिम निर्णयासाठी व्यवस्थापन परीषदेच्या मान्यतेसाठी शिफारस करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

या निर्णयांवर सभेमध्ये सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आले.

बाब क्र २. मा. अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर आलेले विषय

१. पुनः मुल्यांकनासाठी दोन विषयाऐवजी जास्तीत जास्त तीन विषयाकरीता अर्ज करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्याबाबत.

ठराव- सदर बाब ही धोरणात्मक स्वरुपाची असल्यामुळे इतर विद्यापीठामध्ये पुर्नमुल्यांकनाबाबत माहिती घेवून अहवाल सादर करण्यासाठी डॉ. अनिल झेड. चिताडे अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा व डॉ. नविन मुंगले, उपकुलसचिव, रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपुर यांची द्विसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. समितीने शासन नियम व इतर विद्यापीठाची माहिती घेवून १५ दिवसात सदर बाबतचा अहवाल परीक्षा व मुल्यमापन मंडळास सादर करावा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच पुर्नमुल्यांकनाचे दोन विषयाऐवजी तीन विषयांकरीता अर्ज करण्याच्या परवानगीबाबत उच्च व तंत्र शिक्षण ‘विभाग व राजभवन यांना पत्रव्यवहार करावा.

२. जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले असतील अशा विद्याथ्यांची फेरपरीक्षा घेण्याबाबत. सदर विषयाच्या संबंधाने सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले असतील अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा त्वरित घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

३. पदवी अभ्यासक्रमामध्ये श्रेणी सुधारणा पध्दत लागु करण्याबाबत.
ठराव : सद्यास्थितीत श्रेणी सुधारणा पध्दत ही पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लागू आहे. सदर श्रेणी सुधारणा पध्दत ही पदवी अभ्यासक्रमासाठी लागू करणे शक्य आहे काय याबाबत पुर्नमुल्यांकनाच्या संबंधाने वरीलप्रमाणे गठीत केलेल्या समितीने अभ्यास करून अहवाल सादर करावा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here