The गडविश्व
गडचिरोली, २५ जुलै : महात्मा ज्योतिबा संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर 2023 या वर्षासाठी UPSC मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना प्रत्येकी रु. 50,000/- एक रकमी अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यासाठी दि.29.05.2013 च्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय आला होता.
12 जून 2023 रोजी UPSC पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झालेला होता. त्यानुसार महाज्योती मार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील UPSC पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी रु. 50,000/- अर्थसहाय्य करण्याकरिता 16 जून 2023 पासून 08 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 356 अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी 314 विद्यार्थी सदर योजनेचा लाभासाठी पात्र ठरले आहे. स्वातील 298 विद्यार्थ्यांना रू. 50,000/- एक रकमी अर्थसहाय्य त्यांच्या बैंक खात्यात जमा केलेले आहेत. महाज्योतीने आत्तापर्यंत रु. 1,49,00,000/- इतक्या निधीचे विद्यार्थ्यांना वितरण केलेले असून उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर त्यांना रु. 7,00,000/- निर्धारीत करण्यात येईल.
UPSC मुख्य परीक्षा ही दि.15.09.2023 रोगी होणार असून महाज्योतीच्या उमेदवारांना वितरीत केलेल्या अर्थसहाय्याचा या परीक्षेच्या तयारीसाठी लाभ होणार आहे.