पीक विमा योजनेच्या संकेतस्थळाला आली कासवगती : लाभार्थ्यांची केंद्रावर गर्दी

580

– मुदतवाढ होणार काय ?
The गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप २०२३ हंगामात राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १/- रुपया विमा हप्त्यात त्यांचा पीकाचा विमा उतरविण्याची योजना जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी राज्यात निवडलेल्या ९ विमा कंपन्यांच्या माध्यमातून केली जात आहे. पीक विमा योजनेची नोंदणी करण्याची सुविधा सामूहिक सेवा केंद्र (CSC) वर करण्यात आली आहे. मात्र सदर पीक विमा योजनेचे संकेतस्थळ कासवगतीने चालत असल्याने लाभार्थ्यांची केंद्रावर तोबा गर्दी पाहावयास मिळत आहे. तर शेतकरी आपले इतर कामे सोडून पीक विमा भरण्याकरिता सामूहिक सेवा केंद्रावर येताना दिसत आहे.
खरीप २०२३ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२३ अशी आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणावर सामूहिक सेवा केंद्राच्या (CSC) माध्यमातून होत असते. मात्र आता पीक विमा योजनेचे संकेतस्थळाला कासवगती आल्याने शेतकरी ताटकळत बसून असताना दिसत आहे तर पीक विमा भरण्याकरिता मुदतवाढ होणार काय? असा देखील प्रश्न करीत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli, Pm pik vima yojna 2023, csc, gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here