गडचिरोली : जि.प. शिक्षकाचा असाही वापर, आता मंत्र्याचा स्विय सहायक म्हणून करणार काम

207

– जिल्हयात चाललय तरी काय ?
The गडविश्व
गडचिरोली, २८ जुलै : सध्याच्या घडीला जिल्हा विविध बांबीनी चर्चेत आला आहे. आमदारांच्या तलाठी भरती बाबत वक्तव्य, अधिवेशनात जिल्हयाचा विकास झाल्याने सिएसआर निधी बंद करण्याची मागणी तसेच उघडया छताची बस रस्त्यावर धावते या बाबींनी जिल्हयात चर्चेला उधान आले असतांना आता थेट जिल्हा परिषदेचा शिक्षक मंत्र्याचा स्विय सहायक म्हणून काम करणार आहे त्यामुळे जिल्हाभरात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
गडचिरोली जिल्हयातील अहेरी विधानसभा क्षेत्रातुन निवडुन आलेले धर्मरावबाबा आत्राम यांना नुकताच शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामिल झाल्यानंतर मंत्री पद मिळाले. आता मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी हेमलमकसा जि.प.शाळेत विषय शिक्षक म्हणून पदावर कार्यरत असलेले शिक्षक मनोज अंबादास नेवलकर यांची आपल्या अहेरी येथील कार्यालयात स्वीय सहाय्यक या पदावर २६ जुलै पासुन उसनवार तत्वावर नियुक्ती करण्यात येत आहे. नियुक्तीचे आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावे असे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली यांना पत्राव्दारे कळविले आहे. त्यामुळे जिल्हयात चाललय तरी काय ? असा प्रश्न जनतेला पडतांना दिसत आहे.
जिल्हयातील अनेक जि.प. शाळेत अगोदरच शिक्षक नाहीत, शिक्षणाचा खेळखोळंबा होतांना दिसत आहे, शिक्षकांची पदभरती नाही आणि आता खुद मंत्री जिल्हयातील जि.प. शाळेतील शिक्षकाचा वापर करून उसणवार तत्वावर आपला स्वीय सहायक म्हणून नियुक्त करत असल्याने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या या कार्यावर मात्र टिकेची झोड उठत आहे. जि.प. शाळेतील शिक्षकास आपला स्वीय सहायक म्हणून नियुक्त केल्यावर त्या शिक्षकाची नोकरी कोण करणार ? त्या शिक्षकाच्या नोकरीवर गदा येणार काय? जि. प. शिक्षकाचा असाही वापर ? आदी प्रश्न उपस्थित होत असुन शिक्षकांमध्येही नाराजी दिसुन येत आहे.एकूणचं या प्रकरणी शिक्षक संघटना काय भूमिका घेते याकडे सुद्धा लक्ष लागले आहे.

(the gadvishva, the gdv, gadchiroli news, dharmraobaba atram)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here