गडचिरोली : कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका, आरोपींच्या आवळल्या मुसक्या

1293

– तब्बल ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, २८ जुलै : गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी करून कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका करुन ०४ आयसर व ०१ पिकअप वाहनासह तब्बल ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई आष्टी पोलिसांनी २७ जुलै रोजी केली. याप्रकरणी शेख अब्दुल शेख बक्शु, शेख मोबीन शेख, शेख आरीफ शेख नझीर, शेख आरीफ शेख बाबा, चंद्रशेखर गाधाम या आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामधील ईतर ३ असे एकुण ८ आरोपीतांवर पोस्टे आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या आदेशाने अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर आष्टी पोलीस स्टेशनच्या माध्यमातुन कारवाई करण्यात आली असुन त्याअनुषंगाने २७ जुलै २०२३ रोजी गोपनिय माहितीदाराकडुन माहिती प्राप्त झाली असता, ०४ आयसर व ०१ पिकअप वाहनामध्ये अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरून तेलंगाना राज्यात कत्तली करीता कोनसरी ते जैरामपुर मार्गे घेवुन जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना मिळाल्याने सदर माहीतीच्या अनुषंगाने आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कोनसरी ते जैरामपुर जंगल परिसरात नाकाबंदी करुन ०४ आयसर व ०१ पिकअप वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी त्यातील काही आरोपी जंगल परिसराचा फायदा घेवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केले परंतु त्यांना ४ ते ५ कि. मी. पाठलाग करुन पकडण्यात आले आहे.
सदर कारवाईत एकुण ५८,००,०००/- (अक्षरी अठ्ठावन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ०४ आयसर व ०१ पिकअप वाहन व त्यामध्ये एकुण १०४ गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आले. ८ आरोपीतांवर पोस्टे आष्टी येथे गुन्हा क्र. १८७ / २०२३ कलम ४२९, ३४ भादवी, सहकलम ५ (अ), (१), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९५५ (सुधारणा) तसेच सहकलम ३, ११ (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० तसेच सहकलम ११९ महा. पोलिस अधिनियम १९५१ तसेच सहकलम १३०/१७७ मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरचा तपास पोउपनि अजय राठोड हे करीत आहेत.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, पोउपनि अजय राठोड, गणेश जंगले, श्रेणी पोउपनि येनगंटीवार, सफौ/देवतळे, पोहवा /४०७ मडावी, पोना / ३३१९ जाधव, पोना /५१७७ सुरवाडे, पोशी / ३३९५ नागुलवार, पोशी / ५६६१ रायसिडाम, पोशी / ४१५४ पोतराजे, पोशी/ ५६७५ मेंदाळे यांनी पार पाडली आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, gadchiroli police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here