गडचिरोलीला वाहतूक होणारी अवैध दारू सावली पोलिसांनी पकडली

1279

– वाहनासह ३ लाख ४५ हजार ८०० रू.चा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता.प्र / सावली, २८ जुलै : मूल कडून गडचिरोली येथे होणारी अवैध दारू सावली पोलिसांनी सापळा रचून पकडल्याची घटना शुक्रवार २८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजताचे सुमारास घडली. वाहनासह ३ लाख ४५ हजार ८०० रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी नितीन विजयराव सातरे (३४) रा. गोकुळनगर, गडचिरोली यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळनगर येथील आरोपी मुल कडून गडचिरोली येथे अवैध दारू विक्रीसाठी एमएच ३३ ए ६३९९ क्रमांकाच्या मारुती वागोन वाहनाने वाहतूक करण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जून इंगळे, पोलिस निरीक्षक आशिष बोरकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप मोहूर्ले, पोलिस नाईक विशाल दुर्योधन, पोलिस शिपाई धिरज पिदुरकर, अशोक मडावी, जगदिप वाघमारे,विजय कोटणाके,निलेश राऊत,कपिल भंडारवार, गणपत मतामी या पथकाने सापळा रचून नाकाबंदी केली असता संशयित वाहन येताना दिसले असता त्याला अडवून पोलिस पथकाने तपासणी केली. वाहनात संत्रा देशी दारूचे २६ बॉक्स मिळून आले. मिळून आलेल्या वाहनाची किंमत २ लाख ५० हजार, २६ देशी दारू बॉक्स किंमत ८५,८०० रू. व मोबाईल किंमत १०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील कार्यवाही सावली पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here