The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २९ जुलै : इस्लामी कॅलेंडर प्रमाणे आज मोहरम चा १० तारीख ही इमाम हुसैन यांचा हौतात्म दिन म्हणून त्यांचा स्मृती प्रित्थर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इस्लाम धर्माचे प्रवर्तक मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हुसैन यांनी धर्म रक्षणार्थ करबला येथे आपल्या ७२ अनूयायी व कौटूंबिक सदस्यासह अधर्माला शरण जाण्यापेक्षा धर्मरक्षणार्थ हौतात्म पत्करणे स्विकारले होते त्यांचा या बलीदानाची आठवन म्हणून आज सकाळी येथील येथील जामा मस्जिद येथे कूरान पठन तसेच त्यांचा करबला येथील बलीदानाचा प्रसंग प्रवचना द्वारे सांगण्यात आला तसेच येथील मस्जिद चौकात व गेवर्धा बाजार पेठेत कुरखेडा-वडसा मुख्य मार्गावर मुस्लिम युवक मंडळीकडून मुख्य रस्त्यावर वाटसरूना दूध व शरबत चे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी मुस्लिम जामा मस्जिद कमेटी अध्यक्ष डॉ.नासिर खान, उपाध्यक्ष भोलूभाई पठान, सचिव रोशन अली सय्यद, तसेच खलील भाई शेख, मोनू शेख, साहिल शेख, जाफ़र खान,मुन्ना सय्यद, खान, जीशान शेख, शेख व गावकरी सदानंद कंगाली, दर्शन मडावी, नितेश नखाते, मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थित होते.