कुरखेडा येथे मणिपूरच्या ‘त्या’ घटनेविरोधात विविध संघटनेने दर्शविला निषेध

164

– उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १ ऑगस्ट : मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या पाशवी अत्याचाराचा निषेध करीत या विरोधात सोमवार ३१ ऑगस्ट रोजी कुरखेडा उपविभागीय कार्यालयावर विविध ७ संघटनेच्या वतीने संयुक्त निषेध मूक मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपतीना निवेदन पाठविण्यात आले.
मणिपूर येथे एका समूहाद्वारे महिलांची नग्न धिंड काढत त्यांचावर सामुहिक अत्याचार करण्यात आला हे कृत्य अत्यंत निषेधार्य आहे. या घटनेचा निषेध करीत कुरखेडा येथील भारतीय महिला मंडळ कार्यालय गांधी चौक येथून मोर्चा निघत शहरातून फेरी मारत येथील उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी घटनेतील सर्व आरोपींना अटक करीत त्यांचाविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवित न्याय सुनिश्चित करण्यात यावा, या राज्यात शांतता प्रस्थापित करण्याकरीता आवश्यक उपाय योजना करण्यात याव्या तसेच पिडीताना शारिरीक, भावनिक व वित्तीय साहायता प्रदान करीत त्यांचे पूनर्वसन करण्यात यावे यासह अन्य मागण्याचे निवेदन राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी यांचा वतीने नायब तहसीलदार बोके यांनी स्विकारले. यावेळी तहसीलदार राजकूमार धनबाते, ठाणेदार संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार उपस्थीत होते. तर मोर्चात क्रांतीज्योती महिला संघटणा गडचिरोली चंद्रपूर, विदर्भ दिव्यांग संघटणा, भारतीय महिला मंडळ कुरखेडा, संजीवनी महिला बचत गट परिसर संघ कुरखेडा, एकल महिला संघटणा कुरखेडा, गांव संघटणा तालुका कूरखेडा, ग्रामसभा महासंघ कूरखेडा / संघटना यांचा सहभाग होता. मोर्चाचे नेतृत्व शुभदा देशमुख, सुधाताई नाकाडे, आशाताई बानबले, नर्मदा डेकाटे, कूमारीबाई जमकातन, मयूर राऊत, यशवंत पाटणकर, कृष्णा नरोटे, कुणाल गूरनूले, संगीता तूमळे, लीलावती वघारे यांनी केले. मोर्चात मोठ्या संख्येत महिला व पुरूष मंडळी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here