The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १ ऑगस्ट : तालुक्यातील रांगी येथे आज १ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा या ठिकाणी थोर नेते लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक् परशुरामकर सर व उद्घाटिका चांगले मॅडम होत्या. विशेष अतिथी म्हणून दोडके सर व सयाम मॅडम, जांगी सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशान मेश्राम व व कार्यक्रमाचे प्रास्ताविक दोडके सर यांनी केले. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांच्या जीवनावर मान्यवरांनी मार्गदर्शन मन व विद्यार्थ्यांनी सुद्धा भाषण दिले. दरम्यान या शाळेत लोकमान्य टिळकांवर आधारित निबंध स्पर्धा सुद्धा घेण्यात आली.