गडचिरोली : हत्तीने नुकसान केलेल्या घरांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणार

909

– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन
– आमदार कृष्णा गजबे यांच्या मागणीला यश
The गडविश्व
मुंबई, ३ ऑगस्ट : मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आमदार कृष्णा गजबे यांनी पाँइंट ऑफ इन्फार्मेशन च्या माध्यमातून आरमोरी मतदार संघातील कुरखेडा तालुक्यात आलेल्या ३० ते ३५ हत्तीच्या कळपाने हाहाकार माजवला असुन १ ऑगस्ट ला रात्रीच्या सुमारास मौजा आंबेझरी गावात या हत्तीच्या कळपाने हैदोस घालुन गावातील राहत्या घरांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे वन विभागाने सदर नुकसानीचा तातडीने सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना निकषात असलेल्या ५ हजार रुपये ऐवजी जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाकडे मागणी केली. आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थित केलेल्या पाँइंट ऑफ इन्फार्मेशन ची राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेऊन कुरखेडा तालुक्यात हत्तीने नुकसान केलेल्या घरांना ५ हजार ऐवजी सर्व्हेच्या आधारे नुकसानीची तीव्रता पाहुन ९५ हजार पर्यंत महत्तम मदत करण्याचे वनसंरक्षक, गडचिरोली व उपवनसंरक्षक वन विभाग, वडसा यांना निर्देश दिले. त्यामुळे आमदार कृष्णा गजबे यांच्या मागणीला यश येऊन हत्तीने नुकसान केलेल्या घरांचा येत्या २ दिवसात मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here